दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#सूप
दुधी भोपळा ही बहुतेक जणांना न आवडणारी भाजी... माझ्या मिस्टरांना पण नाही आवडत ही भाजी म्हणून मग मी नेहमी सोबत बनवते. खूप छान सोपी रेसिपी आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻😊

दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi)

#सूप
दुधी भोपळा ही बहुतेक जणांना न आवडणारी भाजी... माझ्या मिस्टरांना पण नाही आवडत ही भाजी म्हणून मग मी नेहमी सोबत बनवते. खूप छान सोपी रेसिपी आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 300 ग्रॅम दुधी भोपळा
  2. दीड टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  3. 2 टेबलस्पूनदुधावरची मलई
  4. 1 टीस्पूनगरम मसाला
  5. 1 टीस्पूनधने पावडर
  6. 1 टिस्पून जिरे पावडर
  7. 2हिरव्या मिरच्या तुकडे करून
  8. 2 टेबलस्पूनतूप
  9. 1+1/2 टीस्पून मीठ

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यावी. मग त्याचे मोठे तुकडे केले तरी चालतील. ते पाण्यात घालून स्वच्छ धुऊन घ्यायचे. मग कुकर मध्ये तीन ते साडेतीन ग्लास पाणी व मीठ घालून त्यात चिरलेला दुधीभोपळा घालायचा आणि पहिली शिट्टी होईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा. नंतर गॅस बारीक करून ठेवायचा आणि पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करायचा. किंवा तुमच्या कुकरच्या जजमेंट अनुसार दुधी भोपळा शिजवून घ्या.

  2. 2

    कुकर गार झाल्यानंतर दुधीभोपळा चाळणी मध्ये गाळून घ्या आणि स्टॉक बाजूला काढून ठेवा. दुधी भोपळा गार झाल्या नंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्या.

  3. 3

    आता एका पातेल्यात दोन टेबलस्पून तूप गरम करून त्यात हिरवी मिरची आणि आले लसूण पेस्ट घालून दोन मिनिटे परता.

  4. 4

    आले लसूण पेस्ट भाजल्यानंतर त्यात गरम मसाला घालून 1 मिनिट परता. मग त्यात वाटलेली दुधी भोपळ्याची पेस्ट घालून चार ते पाच मिनिटे भाजून घ्या. आता त्यात हळूहळू स्टॉक घालून घालून चांगले मिक्स करा. चांगले मिक्स झाल्यावर त्यात अर्धा टी स्पून मीठ किंवा तुमच्या नवीन सॉंग मीठ आणि दोन टेबलस्पून घालून चांगले मिक्स करा. दुधावरची मलई घालण्याच्या आधी एका वाटीमध्ये चांगली फेटून घ्या मग घाला. सूप एक दहा मिनिटे चांगले उकळू द्या आणि गॅस बंद करा.

  5. 5

    तयार आहे आपले गरमागरम पौष्टिक दुधी भोपळ्याचे सूप... 😍😍😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes