अफगाणी फतीर प्याजा (afgani fatir pyaza recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल पोस्ट१
अफगाणी भाषेत परोठ्याला फतीर म्हणतात. फतीर प्याजा म्हणजे कांद्याचा परोठा. त्याची रेसिपी मी शेअर करतेय.
अफगाणी फतीर प्याजा (afgani fatir pyaza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल पोस्ट१
अफगाणी भाषेत परोठ्याला फतीर म्हणतात. फतीर प्याजा म्हणजे कांद्याचा परोठा. त्याची रेसिपी मी शेअर करतेय.
कुकिंग सूचना
- 1
१ कप मैद्यामध्ये यिस्ट आणि मीठ घालून मळून घ्या. क्लीन रॅप् पेपर लावून पीठ अर्धा तास ठेवून द्या.
- 2
अर्ध्या तासाने पीठ मस्त फुगून आलं असेल. पीठ परत थोडं मळून घ्या. एक कांदा बारीक पातळ लांब चिरून घ्या.
- 3
पीठाचे गोळे करून घ्या. एक गोळा घेऊन त्याची पातळ चपाती लाटून घ्या. चपातीला वरती बटर लावा. वरती कांदा, मीठ आणि चिली फ्लेक्स टाकून पसरवा.
- 4
मग त्या चपातीची गुंडाळी करा.आणि वर्तुळाकार गुंडाळून घ्या. असे सगळे गोळे तयार करून घ्या. हे गोळे भांड्यात ठेवून वरती क्लिंगरॅप् पेपर लावून दहा मिनिटे ठेवून द्या.
- 5
मग दहा मिनिटांनी परोठे करायला घ्या. पीठाचा गोळा पोलपाटावर घेऊन हाताने गोल पसरवून घ्या. परोठ्याला फोर्कने टोचे मारा. ओव्हन मध्ये १८०° मध्ये १०-१२ मिनिटे बेक करून घ्या किंवा तव्यावर शेकवून घ्या.असे सगळे परोठे करून घ्या. मग गरमागरम परोठे एखाद्या ग्रेव्ही बरोबर सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या