चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)

चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम थोड्या कोमट (लूक वॉर्म) दूधात साखर, यीस्ट घालून १० मिनिटे झाकून ठेवा.
- 2
१० मिनीटानी यीस्ट एक्टीव होईल.
- 3
एका बाउल मध्ये मैदा, मिल्क पावडर, व मेल्ट केलेले बटर घाला
- 4
सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या व आता त्यात एक्टीव यीस्ट वाले दूध हळूहळू घालून त्याचा डो भिजवून घ्या.त्यावर आता थोडे तेलाचे ब्रशींग करा व २० मिनिटे झाकून ठेवा.
- 5
२० मिनीटात भिजवलेला पिठाचा गोळा डबल होईल.आता ५-१० मिनिटे व्यवस्थित मळून मळून घ्या.
- 6
आता त्याची थोडी जाडसरच पोळी लाटून घ्या व ग्लास आणि छोट्या झाकणाच्या सहाय्याने डोन्ट कट करून वरुन तेलाचे ब्रशींग करा व १५ मिनिटे झाकून ठेवा.
- 7
१५ मिनिटांनी पुन्हा डोन्ट ची साईट डबल होईल.आता तेल गरम करून मध्यम आचेवर तयार केलेले सर्व डोन्ट तळून घ्या.
- 8
दोन्ही बाजूने डोन्ट व्यवस्थित तळून घ्या.काही डोनट गरम असतानाच आवडत असल्यास पीठी साखरेत घोळवून घ्या.
- 9
आता व्हाईट व डार्क चॉकलेट डबल बोईलर पद्धतीने मेल्ट करा व त्यात तयार केलेले डोनट एका बाजूने चॉकलेट मध्ये डीप करून कलरफुल स्प्रींकल ने किंवा
- 10
डार्क चॉकलेट वर व्हाईट चॉकलेट चर्या लाईन व व्हाईट चॉकलेट वर डार्क चॉकलेट च्या लाईन करून डोनट तयार करुन घ्या.
Top Search in
Similar Recipes
More Recipes





























टिप्पण्या (6)