पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)

#GA4 week 2 (Spinach)
पालक डाळ भाजी हा नागपूर विदर्भातील पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणा समारंभात करतात.अतिशय चविष्ट आणि सात्त्विक अशी आहे.भाकरी, पोळी,भात कशा सोबत ही उत्तम च लागते.

कुकिंग सूचना
- 1
भिजवलेल्या दोन्ही डाळी धुवून घ्या. डाळ व दाणे एकत्र करून कुकरमध्ये छान शिजवून घ्या. शिजल्यावर हाटून घ्या.
- 2
पालक स्वच्छ धुवून बारीक चिरा.
- 3
कढईत २ टेबलस्पून तेल तापवून त्यात मोहरी, हळद, तिखट, धणेपूड, गरम मसाला, आले किस, कढिपत्ता आणि चिरलेला पालक घालून शिजवा. त्यात मीठ आणि डाळीचे मिश्रण घालून उकळी काढा.
- 4
गरम गरम भाजी घडीच्या पोळी सोबत वाढा. वाटल्यास, वरुन तेलाची खमंग फोडणी किंवा कच्चे तेल घाला.
- 5
टीप- हि भाजी सात्त्विक अशी असल्यामुळे शक्यतो कांदा-लसूण वापरत नाही.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या