मेथीचे लाडू (methi ladoo recipe in marathi)

#GA4 #week2 #fenugreek
#cooksnap #ptriteevsalvi
थंडीच्या दिवसात आवर्जून खावे असे आरोग्यास अतिशय उत्तम ऊर्जावर्धक मेथीचे लाडू. ही पारंपारिक रेसिपी आहे. डिंकाच्या लाडवाप्रमाणेच हे लाडू आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर असतात. आपण.बघुया मेथीच्या लाडूची पाककृति.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम मेथी पावडर अर्धी वाटी तूपामध्ये दोन दिवस भिजत घाला. मेथी पावडर तूपामध्ये भिजत घातल्याने मेथीचा कडूपणा कमी होतो.
- 2
लाडू करतांना एका तव्यामध्ये खसखस भाजून घ्या आणि त्याची पावडर करा. बदामाची पूड करा. सुकं खोबरं भाजून ते बारीक करून घ्या. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात डिंक तळून घ्या व मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- 3
त्याच पॅनमध्ये कणिक तूप टाकून मिडियम गॅसवर छान खमंग भाजून घ्या. भाजलेली कणिक बाजूला काढून घ्या. त्याच पॅनमध्ये गूळ वितळवून घ्या.
- 4
भाजलेल्या पिठामध्ये गूळ आणि सर्व साहित्य घाला. मग पिठीसाखर घालून सुंठ पावडर आणि वेलची जायफळ पूड घाला
- 5
मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडू करून घ्या.
Similar Recipes
More Recipes
- कोकोनट काजू वॉटरमिलन बर्फी (Coconut kaju watermelon barfi recipe in marathi)
- सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)
- चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
- टोमॅटो आँम्लेट पिझ्झा (tomato omelette pizza recipe in marathi)
- क्रिस्पी चकली (crispy chakali recipe in marathi)

टिप्पण्या