कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कांदे व शिमला मिरचीचे मोठे काप करून घ्यावे.सोबतच लसूण, मिरची व आल्यास अगदी बारीक चिरून घ्यावे.एका कढईत तेल घ्यावे व उकडलेल्या अंड्याचे पिवळे भाग काढून पांढरे भाग क्रिस्पी तळून घ्यावे. त्याच गरम तेलात कांदे व हिरव्या मिरच्या घालाव्या.दोन मिनिटे चमच्याने परतत राहावे व त्यात लसूण आलं ॲड करावे.
- 2
दोन मिनिटे लसूण व आले शिजल्यानंतर त्यात सोया सॉस, चिली सॉस व व्हिनेगर ऍड करावे.सोबतच एक चिमूट मीठ घालून थोडे पाणी सोडावे.पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तळलेली अंडी सोडावी.अंडी दोन ते तीन मिनिटे सॉसमध्ये शिजू द्यावी व त्यात कॉर्नफ्लोअर आणि पाण्याची पेस्ट ॲड करावे जेणेकरून साॅस थीक होणार.
- 3
दोन ते तीन मिनिटे हे सर्व शिजू द्यावे व गरम गरम चायनिज चिली अंडा सर्व करावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13735183











टिप्पण्या (3)