जिंजर नानकटाई (nankhatai recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#नानखटाई #सप्टेंबर

नानकटाई म्हणजे आपली इंडियन कुकीज... (without शुगर) आज मी जिंजर फ्लेवर नानकटाई बनविण्याचा प्रयत्न केला आहे. मैदा आणि कणिक एकत्र करून त्यात मी मध आणि आल यांचे मिश्रण घातले... मध आणि आल्याची एक भन्नाट चव आणि त्याचबरोबर आल्याचा तो मस्त घमघमाट.... एका हातात वाफाळलेला चहा अन् दुसऱ्या हातात ही जिंजर नानकटाई अहाहाहा.... मूड एकदम मस्त झाला.....

माझ्याकडे ओव्हन नसल्याने सहसा मी या बेकिंग डिश बनवत नाही.... पण ही एक वेगळ्या फ्लेवरची नानकटाई तयार केली...व माझा आत्मविश्वास वाढला... Thanks Cookpad 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
सहा जणांसाठी
  1. 8 टेबलस्पूनमैदा
  2. 8 टेबलस्पूनकणिक
  3. 6 टेबलस्पूनपिठी साखर
  4. 4 टेबलस्पूनमध
  5. 2 टेबलस्पूनबटर किंवा साजूक तूप
  6. 2 टेबलस्पूनमोठे आल्याचे तुकडे किंवा पावडर
  7. 1 टीस्पूनबेकिंग सोडा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम एका कढईत तूप आणि मध घालून ते चांगले एकजीव होईपर्यंत गॅस वर गरम करून घ्यावे.

  2. 2

    दुसऱ्या एका बाउलमध्ये मैदा, कणिक, पिठीसाखर, बेकिंग सोडा एकत्र करून घ्यावा. त्यात आल्याचे तुकडे किसून घालावेत. किंवा आल्याची सुखी पावडर घालावी. या मिश्रणात आता वरील बटर व मध यांचे केलेले मिश्रण घालून ते एकजीव करावे.

  3. 3

    वरील मिश्रण मळून घ्यावे व त्याचा एक डो बनवून घ्यावा.

  4. 4

    या डो चे आता छोटे छोटे गोळे करून घेऊन ते दाबून त्याला गोल आकार देऊन घ्यावा.

  5. 5

    कुकर १० मिनिटे प्रीहिट करून घ्यावा त्यात एक रिंग ठेवावी. त्यावर एक ग्रीस केलेली प्लेट ठेवून ही तयार केलेली बिस्किटे थोड्या अंतरावर बेक होण्यासाठी ठेवावीत. २५ मिनिटे मध्यम आचेवर बेक करून घ्यावे.

  6. 6

    बेक झाल्यावर ही बिस्किटे बाजूला काढून गार करण्यासाठी ठेवून द्यावीत.

  7. 7

    गार झाल्यावर ही बिस्किटे चहासोबत फॅमिली ला सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

Similar Recipes