सुक्या बोंबीलाची चटणी /ठेचा (sukya bombilachi chutney recipe in marathi)

ताज्या मासोळ्यांबरोबरच उत्कृष्ट दर्जाची सुकी मच्छी मावरे मिळते. समुद्रकिनारी मस्त बोंबील आणि अन्य मासे खाऱ्या वाऱ्यावर उन्हात सुकण्यासाठी ओलाणीवर रांगेत टांगलेले दिसतात. सोडे बनवण्यासाठी कोलंबी आणि करंदी, जवळा ठिकठिकाणी जमिनीवर पसरतात. सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा पावसाळ्यात वादळी मुळे बोटी जेव्हा मासेमारी साठी जात नसतात तेव्हा सुकी मच्छी वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही. 🤷♀️😊

कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर बोंबील भाजून घ्या. भाजून झाल्यावर त्याचे लहान लहान तुकडे करून घ्या.
- 2
नंतर उखळ मध्ये भाजलेल्या बोंबलाचे तुकडे व लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, लिंबू रस व चवीनुसार मीठ घालून मिश्रण व्यवस्थित बारीक ठेचून घ्या. उखळ नसल्यास मिक्सरमध्ये 2 सेकंद फिरून घ्या.
- 3
सुक्या बोंबीलाची चटणी वाफाळत्या करी भाताबरोबर किंवा गरमागरम भाकरी बरोबर छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या