विदर्भ स्पेशल झणझणीत डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)

विदर्भ स्पेशल झणझणीत डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम डाळ 1/2 भिजत घालावी.नंतर कांदे बारीक चिरून घ्या. मग एक कांदा खोबर मोठी विलायची दालचिनी जिर एका कढई मध्ये थोडस तेल टाकून छान भाजून घ्यावे.
- 2
नंतर त्याची पेस्ट करून घेणे. आल लसूण पेस्ट करून घ्यावी.
- 3
मग एका पातेल्यात तेल टाकून त्यात तमालपत्र टाका. लगेच चिरलेले कांदे टाका मिक्स करा. स्लो गॅस वर कांदे 10 -15 मिनिट छान शिजू द्यावे. कांदे मुरल्यावर आल लसूण पेस्ट आणि कांदा खोबर ची पेस्ट टाका.
- 4
छान मिक्स करत राहावे. स्लो गॅस वर मग मसाला झाला की त्यात डाळ टाकावी. मिक्स करावे. मग डाळ पण मसाल्यात होऊ द्यायची.
- 5
थोड तेल सुटायला लागलं की त्यात तिखट मीठ हळद धने पूड घालून मिक्स करावे. 2 मिनिट मिक्स करत राहावे. मग त्यात 1 ग्लास पाणी टाकावे.आणि उकळू द्यावे.
- 6
रस्सा उकडल्या नंतर डाळ हातांनी दाबून बघायची. आणि मग वर तेल उतरल की गॅस बंद करावा.आणि वरून गरम मसाला टाका कोथिंबीर पण टाका आणि झणझणीत असा डाळ कांदा तयार.
- 7
चपाती भात सोबत डाळ कांदा सर्व्ह करावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
- उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी (upwasachi dahi shengdana chutney recipe in marathi)
- मशरुम मसाला (mushroom masala recipe in marathi)
- चिवळभाजीचा झुणका (chawali bhaji zunka recipe in marathi)
- दलिया पौष्टिक ढोकळा रेसिपी (daliya dhokla recipe in marathi)






















टिप्पण्या