जलेबी कुरकुरीत होममेड (jalebi recipe in marathi)

#cooksnap
#jalebi
#jilbi
जिलबी अर्थात मराठीत जिलबी म्हणुन ओळखला जाणारा हा पदार्थ खुप प्रसिध्द आहे तो त्याच्या चवीमुळे आणि त्याच्या दिसण्यामुळे देखील. खरं तर हा असा पदार्थ आहे जो बनवण तसं फार सोप आहे आणि सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा असा हा पदार्थ आहे. गोड पदार्थांमध्ये ब-यापैकी स्वस्त आणि खायला मस्त असं या पदार्थांचं वर्णन आपल्याला करता येईल.

कुकिंग सूचना
- 1
मैदा, बेकिंग पावडर, दही आणि पाणी एका भांडयात टाकुन त्याला चांगल्या प्रकारे मिसळुन घ्या. मिसळल्यानंतर त्याला चांगले फेटुन मुलायम होईपर्यंत फेटा.
- 2
साखरेला पाण्यात टाकुन चांगला घट्ट पाक तयार करा. चांगला पाक तयार होण्याच्या 1 मिनीटा आधी त्यात खाण्या चा रंग आणि इलायची पावडर टाका
- 3
आता कढईत तेल किंवा तुप गरम करा आणि गोलाकार चकलीच्या आकाराच्या छोटया छोटया जिलब्या त्यात सोडा. एका वेळी काहीच जिलब्या तळया.
- 4
जिलबीला तोपर्यंत तळत राहा जोपर्यंत त्याचा रंग हलका सोनेरी होत नाही आणि ती कुरकुरीत होत नाही.
- 5
तळल्यानंतर त्या जिलबील बाहेर काढा आणि किचन पेपर वर ठेवा जेणेकरून त्यातील तेल किंवा तुप निघुन जाईल आणि त्यानंतर साखरेच्या पाकात बुडवा. 4 ते 5 मिनीटे त्यात ठेवल्यानंतर बाहेर काढा.
- 6
शेवटी पाकातुन काढुन सव्र्ह करा गरमागरम जिलबी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (7)