लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोफ्ता करून घ्यावा.त्यासाठी दूधी स्वच्छ धूवून किसून त्यातील पाणी पिळून घ्यावे.
- 2
आता या किसात बेसन,रवा,तांदळाचे पिठ,हळद,तिखट,मीठ,आमचूर पूड,ओवा,जीरे थोडे तेलाचे मोहन घालून घट्टसर भिजवून त्याचे कोफ्ते करावे.
- 3
आता कोफ्ते तेलात तळून घ्यावे.थोडे थंड होऊ द्यावे.
- 4
तोपर्यंत करी करून घ्यावी.त्यासाठी प्रथम सगळे साहीत्य घेऊन ते तेलात परतून मग मिक्सर मधून वाटून घ्यावे.
- 5
आता मसाला वाटून तयार करून घ्या.
- 6
आता कढईत तेल गरम करून त्यात हे वाटण तेल सुटेपर्यंत परता.
- 7
छान परतले की त्यात तिखट,हळद,गरम मसाला घाला.तेलसूटू द्या.
- 8
मग त्यात पाणि घालून एक उकळी येउ द्या.मीठ घाला.
- 9
ऊकळी आल्यावर त्यात कोफ्ते घाला आणि पाच मिनिटे वाफवा.
- 10
आता कोफ्ता करी तयार आहे.वरून कोथिंबिर आणी मलईने गार्निश करून गरम गरम सर्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14073196



















टिप्पण्या (2)