पाईन एप्पल शिरा (pineapple sheera recipe in marathi)

पाईन एप्पल शिरा (pineapple sheera recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 कप रवा चागलं करपूस होईपर्यंत परतून घ्या. रवा 10 मिनिट चागलं मंद आचेवर परतून घ्या.
- 2
रवा चागलं करपूस झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या. त्यानंतर गॅस चालू करून एका कढईमध्ये 1 कप पाईन एप्पल पेस्ट टाकून चागलं परतून घ्या.
- 3
त्यामध्ये 1/2 कप साखर घालून चागलं मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 1/2 कप पाईन एप्पलचे छोटे तुकडे टाका.
- 4
पाईन एप्पलचे तुकडे विरगळल्यानंतर 2 कप पाणी टाका. त्यानंतर 1 कप दूध पावडर घालून चागलं मिक्स करून घ्या.
- 5
पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये 2 कप रवा टाकून चागलं मिक्स करून घ्या. रवा 5 मिनिट मंद आचेवर चागलं शिजवून घ्या. रवा कढई सोडल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून इलायची पावडर घालून चागलं मिक्स करून गॅस बंद करा. आता तयार केलेला शिरा एका डिश मध्ये काढून त्यावरती बदामाचे तुकडेने डेकोरेशन करा. आता शिरा सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या