चिकन बिर्यानी (chicken biryani recipe in marathi)

चिकन बिर्यानी (chicken biryani recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चिकन धुवून घ्यावे आणि कांदे पण स्वछ करून घ्यावे। आता चिकन घेऊन त्यात मिरची, हळदी, जीरे, धने पावडर घालावे; त्यात अद्रक लसूण पेस्ट, मीठ, थोडे हिंग, दही, तेल आणि तूप घालावे आणि शेवटी पुदिना घालून मिक्स करावे।
- 2
आता मिश्रण चांगले मिक्स करून 30 मिनिटे-1 तास झाकून ठेवावे। पुढे कांदे लांब कापून फ्राय करून घ्यावे।
- 3
जितके चिकन तितकाच बासमती तांदूळ घेऊन चांगला धुवून घ्यावा आणि पाणी घालून 30 मिनिटे बाजूला ठेवावा। सोबत हिरव्या मिरच्या आणि टमाटे कापून घ्यावे।
- 4
आता कढई मधे तेल घालून त्यात कांदा, घालावा, नंतर अद्रक लसूण पेस्ट आणि मिरच्या घालून परतून घ्यावे। पुढे त्यात चिरलेले टमाटे घालावे आणि मुसमुसत होई पर्यंत परतून घ्यावे। आता त्यात चिकन चे मिश्रण घालावे आणि 15 मिनिटे शिजू द्यावे।
- 5
पुढे त्यात कोथिंबीर बारीक कापून घालावी आणि मिक्स करून घ्यावे। आणि थोडे पाणी घालून परत 5-8 मिनिटे परतून घ्यावे।
- 6
आता एका मोठ्या भांड्यात पाणि गरम करून घ्यावे आणि त्यात खडे मसाले, तूप आणि मीठ घालून उकळून घ्यावे। उकळी आल्यावर त्यात तांदूळ घालुन मिक्स करून घ्यावे आणि 3 मिनिटे ठेवून गॅस बंद करून घ्यावा। आता तांदूळ चाळणीने काढून घ्यावा।
- 7
आता एका मोठ्या भांड्यात बिर्यानी ठेवायला तूप घालावे। पुढे त्यात एक एक करून तांदूळ आणि चिकन ची लेअर घालावी, सोबत पुदिना, कोथिंबीर, केसर दूध आणि फ्राईड कांदा घालावा। आता अल्युमिनियम फॉइल ठेवून झाकण बंद करावे आणि 10मिनिटे मध्यम आचेवर आणि 25 मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे।
- 8
आता 35-40 मिनिटे झाल्यावर आपली बिर्यानी तयार । सोबत दही रायता बनवून सर्व करावे।
Keywords
Similar Recipes
More Recipes

























टिप्पण्या (2)