झणझणीत मटण.. (zhanzhanit mutton recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#लंच
#मटण
आज काल नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. नॉनव्हेज खाणार्‍यांची पहिली पसंत मटण ...
मटण खूप वेगवेगळ्या प्रकारे बनविले जाते. प्रत्येकाची बनविण्याची पद्धत वेगळी असली तरी, मटणाला स्वतः ची विशिष्ट प्रकारची चव असल्याने, ते कसेही बनविले तर चांगलेच लागते. आता मटणाची चव मला माहित नाही. कारण मी नॉनव्हेज खात नाही. पण एकंदरीतच घरातील लोकांनी दिलेली प्रतिक्रिया...पण बाहेर मैत्रिणीसोबत केलेल्या चर्चेत मला ते जाणवले...💃 💕

झणझणीत मटण.. (zhanzhanit mutton recipe in marathi)

#लंच
#मटण
आज काल नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. नॉनव्हेज खाणार्‍यांची पहिली पसंत मटण ...
मटण खूप वेगवेगळ्या प्रकारे बनविले जाते. प्रत्येकाची बनविण्याची पद्धत वेगळी असली तरी, मटणाला स्वतः ची विशिष्ट प्रकारची चव असल्याने, ते कसेही बनविले तर चांगलेच लागते. आता मटणाची चव मला माहित नाही. कारण मी नॉनव्हेज खात नाही. पण एकंदरीतच घरातील लोकांनी दिलेली प्रतिक्रिया...पण बाहेर मैत्रिणीसोबत केलेल्या चर्चेत मला ते जाणवले...💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 500 ग्राममटण
  2. 3-4 टेबलस्पूनआले लसुण कोथिंबीर पेस्ट
  3. 3-4 टेबलस्पूनखसखस
  4. 2-3 टेबलस्पूनखोबरे कीस
  5. 3-4मोठे कांदे
  6. 2-3 टेबलस्पूनशेंगदाणे
  7. 3-4 टेबलस्पूनतिखट
  8. 1-2 टेबलस्पूनजिरापावडर, धनेपावडर
  9. 1 टिस्पुनहळद
  10. 2-3तेजपान
  11. 1 तुकडाकलमी
  12. 4-5मिरे
  13. 4-5लंवग
  14. 1-2मोठी विलायची
  15. 1-2दगडफुल
  16. 1-2छोटी विलायची
  17. मीठ चवीनुसार
  18. 1 टेबलस्पूनशहाजिरे
  19. पाणी आवश्यकतेनुसार
  20. 1 टेबलस्पूनकाळामसाला
  21. 1-2जायपत्री

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    मटण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे.व हे मटण कुकर मध्ये घालावे. त्यावर एक ते दोन टेबलस्पून तेल, 1/2 टीस्पून मीठ, हळद घालून दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यावे.

  2. 2

    तव्यावर खसखस, खोबरे, शेंगदाणे भाजून घ्यावे. कांदा चांगला गुलाबीसर होईस्तोवर भाजून घ्यावा. सारे खडे मसाला देखील थोडे गरम तव्यावर शेकून घ्यावे.

  3. 3

    खसखस, खोबरे, शेंगदाणे, कांदा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्यावी. आले लसून पेस्ट करून घ्यावी. सर्व खडे
    मसाले बारीक करून घ्यावीत.

  4. 4

    पॅनमध्ये 1/2 कप तेल घालून गरम होऊ द्यावे. तेल चांगले तापले कि, त्यामध्ये कांदा आललसून कोथिंबीर पेस्ट घालावी. दोन मिनिटे परतून घेतल्यानंतर, मिक्सर मधून बारीक केलेला मसाला घालावा. एक मिनिट परतून घ्यावे. त्यानंतर त्यात तिखट, धनेपावडर, जिरापावडर, हळद, थोडासा गरम मसाला घालून, तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

  5. 5

    नंतर कुकरमध्यले मटण या परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये घालून, दोन मिनिटे झाकण ठेवून चांगले मसाल्यामध्ये शिजवून घ्यावे. नंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी, चवीनुसार मीठ(लक्षात असू द्यावे की, आपण कुकरला शिजवून घेतलेला मटणात देखील मीठ घातले होते. तेव्हा मीठ कमी घालाल) घालून मटणाला उकळी येऊ द्यावी.

  6. 6

    आता यामध्ये गरम मसाला व कोथिंबीर घालून गरमा गरम चपाती सोबत भातासोबत सर्व्ह करा... *झणझणीत मटण*... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
वाह, मस्तच झणझणीत दिसतेय मटण

Similar Recipes