वेट लॉस दाल सूप (weight losse daal soup recipe in marathi)

वेट लॉस दाल सूप (weight losse daal soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये 1/2 कप तुरडाळ आणि 1/2 कप मसूरडाळ पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन 15 मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवा.
- 2
15 मिनिट झाल्यानंतर कुकरमध्ये भिजून ठेवलेले डाळ घ्या. त्याच्यामध्ये 1/2 इंच बारीक चिरलेले अदरक,5-6 बारीक चिरलेले लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेले आणि मीठ चवीनुसार घालून 2 कप पाणी घालून चागलं मिक्स करून घ्या.
- 3
त्याचानंतर कुकरला झाकण लावून गॅस वर ठेवा. कुकरच्या 3 शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा. नंतर तयार झालेले मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
- 4
त्याचानंतर वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये थोडे पाणी घालून गॅस वर ठेवा. त्याच्यामध्ये 1 लिंबू पिळून घाला. हे मिश्रण 5 मिनिट उकळून घ्या. त्याच्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून काळी मिरी पावडर घालून मिक्स करून गॅस बंद करा. तयार झालेले सूप एका बाउलमध्ये काढून त्याच्यावरती थोडे बारीक चिरलेली कोथींबीर घाला. आता सूप सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या