बुद्धिवर्धक अक्रोडाचे लाडू (akrodache ladoo recipe in marathi)

#Walnuts अक्रोड हे बुद्धीवर्धक आहे तसेच बदाम व ड्रायफूट सुद्धा बुद्धिवर्धक आहे व त्यामध्ये सोयाबीन पीठ व बाकीचे साहित्य घालून मी हे लाडू बनवले मुलांसाठी तर उत्तमच आहे आणि मोठ्यांना सुद्धा आवडतील.

कुकिंग सूचना
- 1
कढई गरम करून त्यामध्ये अक्रोड, पिस्ता, बदाम, काजू व कलिंगडाच्या बिया भाजून घेणे. थंड झाल्यावर मिक्सरमधून त्याची बारीक पावडर तयार करावी.
- 2
कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये डिंक तळून घ्यावा थंड झाल्या की त्याची पावडर करून घ्यावी. तसेच शेंगदाण्याचे कूट, खोबरे, डाळ व तीळ भाजून त्याची बारीक पावडर करून घ्यावी.
- 3
कढईमध्ये सोयाबीनचे पीठ व गव्हाचे पीठ व तूप घालून चांगले खमंग भाजून घ्यावे.
- 4
परातीमध्ये वाटलेले सर्व पावडर व वाटलेली पिठीसाखर घालून नीट करावे व कढईमध्ये पीठ भाजल्यावर त्यामध्ये सर्व मिश्रण घालून वरून तूप घालावे व वेलची पावडर घालून चांगले एकजीव करावे.
- 5
सारखे एकजीव झाल्यानंतर गरम असतानाच त्याचे लाडू वळून घ्यावे.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या