तांदळाचे घावणे. (tandache ghavne recipe in marathi)

Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780

#ब्रेकफास्ट
आमच्या कडे कोकणात घावने हा पदार्थ सर्रास न्याहरी साठी बनवला जातो.
तांदूळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ कोकणात ल्या लोकांचे staple food म्हणू शकतो आपण😊.

तांदळाचे घावणे. (tandache ghavne recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
आमच्या कडे कोकणात घावने हा पदार्थ सर्रास न्याहरी साठी बनवला जातो.
तांदूळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ कोकणात ल्या लोकांचे staple food म्हणू शकतो आपण😊.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
२ लोक
  1. 2 वाट्याजुना तांदूळ -
  2. पाणी
  3. मीठ - चवीनुसार
  4. 2 टेबलस्पूनतेल -
  5. चटणी चे साहित्य
  6. 1 वाटीओलं खोबरं -
  7. १ टेबलस्पून कोथिंबीर - (बारीक चिरलेली)
  8. १ इंच आलं - तुकडा
  9. हिरवी मिरची -

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    आदल्या रात्री २ वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घाला.

  2. 2

    दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.

  3. 3

    वाटलेल्या पिठात भरपूर पाणी आणि चवीनुसार मीठ घाला आणि नीट ढवळून घ्या.मिश्रण पातळ ठेवा.

  4. 4

    एकी कडे बिड्याचा तवा गरम करत ठेवा.घावणे बिड्याचया तव्यावर छान होतात

  5. 5

    बीड गरम झाल्यास त्याला तेल लावा आणि पळी ने झटकन मिश्रण घाला.

  6. 6

    २ मिनिटे झाकण लावून घवणा शिजू द्या.

  7. 7

    नंतर घावणा परतून घ्या.

  8. 8

    चटणी साठी ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं बारीक वाटून घ्या.

  9. 9

    पाहिजे असल्यास फोडणी द्या किव्वा चटणी अशी पण छान लागते.

  10. 10

    गरम गरम तांदळाचे घावणे तयार. तुम्ही चटणी किव्वा हिरव्या वाटण्याच्या उसळी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes