उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

#उकडीचे मोदक ,अंगारीका संकष्टी म्हणुन आज मी बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवले .
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#उकडीचे मोदक ,अंगारीका संकष्टी म्हणुन आज मी बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवले .
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक कढई गॅसवर ठेवावी, त्यात चमचाभर तूप घालून किसलेला गूळ घालावा व थोडा पातळ झाला की त्यात किसलेले खोबरे घालावे तसेच त्याच्यात भाजलेली खसखस व बदामाची पावडर घालावी व मिश्रण एकजीव करून त्यात मीठ थोडा गूळ आटवावा हो मिश्रणात वेलची पावडर घालावी व गॅस बंद करावा.
- 2
एक पातेले गॅसवर ठेवून त्यात 2 कप पाणी ठेवावे त्यातच एक चमचा तूप व चिमुटभर मीठ घालावे व पाण्याला उकळी आली की त्या दोन कप तांदळाचे पीठ घालावे व चांगले ढवळून झाकण ठेवून दोन मिनिटं मंद आचेवर ठेवावे नंतर गॅस बंद करावा
- 3
आता उकडलेले पीठ एका भांड्यात घेऊन थंड पाण्याचा हात घेऊन मळून घ्यावे. आता या पीठाचे गोळे करून त्याच्या वाट्या करून त्याचा सारण भरून मोदकाचा आकार द्यावा.
- 4
आता गॅस वर एक भांडे ठेवून त्यात पाणी ओतून उकळू द्यावे व त्यावर मोदकाची चाळणी ठेवून व त्यावर झाकण ठेवून मोदक दहा मिनिटे वाफवून घ्यावे व गॅस बंद करुन दहा मिनिटे तसेच ठेवावे.
- 5
दहा मिनिटाने मोदक काढून घ्यावे. तयार झाले आपले उकडीचे मोदक
Keywords
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या