कोथिंबीर वड्या (kothimbir wadya recipe in marathi)

#wd, स्पेशल वूमन डे च्या निमित्ताने मी कोथिंबीर वड्या ही रेसिपी माझ्यासाठी स्पेशल असणारी माझी मैत्रीण प्रिया डोईजड हीला डेडीकेट करून खास केली आहे.
कोथिंबीर वड्या (kothimbir wadya recipe in marathi)
#wd, स्पेशल वूमन डे च्या निमित्ताने मी कोथिंबीर वड्या ही रेसिपी माझ्यासाठी स्पेशल असणारी माझी मैत्रीण प्रिया डोईजड हीला डेडीकेट करून खास केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोथिंबीर निवडून स्वच्छ धुऊन निथळत ठेवावी, नंतर ती चिरुन घ्यावी.
- 2
हिरवी मिरची व लसूण यांचा ठेचा करून घ्यावा. आता एका भांड्यात कोथिंबीर घेऊन त्यात बेसन, तांदळाचे पीठ, हळद,मीठ, पांढरे तीळ, लाल तिखट व मीठ घालून ते मिश्रण हाताने चांगले मिसळून घ्यावे
- 3
मिश्रण चांगले मळून मळून घ्यावे व दोन टेबलस्पून त्यात पाणी घालून ते मिश्रण एकजीव करावे आता त्या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत मळत रहावे व शेवटी त्याला थोडेसे तेल लावून ठेवावे.
- 4
आता एका ताटाला तेल लावून त्यावर हा मिश्रणाचा गोळा ठेवून तो चांगला पसरावा व एका पातेल्यात गॅस वर पाणी ठेवून त्या टोपा वर वरील मिश्रणाचे ताट ठेवून पंधरा मिनिटं हे मिश्रण वापरून घ्यावे व गॅस बंद करुन तसेच झाकून ठेवावे
- 5
वरील मिश्रण थंड झाले की त्याच्या वड्या पाडून त्या तेलामध्ये तळून घ्याव्यात.
- 6
आता या वड्या तेलात छान खरपूस तळून घ्यावेत
- 7
तयार झालेल्या आपल्या खुसखुशीत चमचमीत कोथिंबीर वड्या
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या