कुड्याच्या फुलांची भाजी (kurdyacha phulanchi bhaji recipe in marathi)

#कुड्याच्या फुलांची भाजी, कुड्याची म्हणजे गावात जंगलामध्ये कुडा नावाचे झाड असते त्यांना पांढरी शुभ्र रंगाची सुगंधी फुले असतात त्यांची भाजी केली जाते तीच भाजी आज मी केली आहे

कुकिंग सूचना
- 1
प्रथम कुड्याची फुले व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घ्यावी व त्यात पाणी घालून ती गॅसवर उकळत ठेवावी
- 2
फुले चांगली शिजली कि त्यातील गरम पाणी काढून पुन्हा त्यात थंड पाणी घालून ती फुले स्वच्छ धुवावी व ती पिळुन घ्यावी
- 3
पिळुन घेतलेली भाजी सुरीने मोठी मोठी कापून घ्यावी, आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल ओतावे व ते गरम झाले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा तो थोडा भाजला कि त्यात लसुन ठेचुन टाकावे व हे दोन्ही पण साहित्य चांगले भाजून घ्यावे
- 4
कांदा लसूण चांगला भाजला कि त्यात लाल तिखट, हळद, मीठ व गरम मसाला घाला चांगले मिश्रण परतून घ्यावे व त्यात वरील चिरलेली फुलांची भाजी घालावी, भाजी चांगली परतून घ्यावी व त्याच्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटे वाफवून द्यावी व सर्वात शेवटी ओले खोबरे घालून ती पुन्हा परतून गॅस बंद करावा
- 5
तयार झाली आपली कुड्याच्या फुलांची चमचमीत भाजी
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या