कैरीचा कायरस (kairicha kayras recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar @cook_26498320
#कैरीचा कायरस, हा पदार्थ खूप चटपटीत लागतो
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कैऱ्या स्वच्छ धुऊन साल काढून तिचे मध्यम तुकडे करावेत
- 2
आता पातेले गॅसवर ठेवून त्यात 1 टेबलस्पून तेल घालून तेल गरम झाले की त्यात मोहरी घालावी व ती व तडतडली की त्यात एक टेबलस्पून उडदाची डाळ व पाव चमचा मेथी आणि कढीपत्ता घालावा त्यात कैरीचे तुकडे घालून चांगले परतून घ्या आता त्यात हळद तिखट व मीठ घालून कैरी नीट परतून घ्यावी.
- 3
आता वरील मिश्रणात पाणी घालून कैरी चांगली शिजू द्यावी. आता या मिश्रणात एक वाटी ओले खोबरे व 2चमचे तांदळाचे पीठ घालून मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवून ती घालून मिश्रण सतत ढवळत राहावे पाच मिनिटांनी गॅस बंद करावा
- 4
शेवटी वरील मिश्रणात एक वाटी गूळ घालावा व चांगली उकळी काढावी,तयार झाला आपला,चटपटीत गरमागरम कैरीचा कायरस
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14735612













टिप्पण्या