मँगो कोकोनट जेली (mango coconut jelly recipe in marathi)

# जेली
माझ्या नातवाला जेली खूप आवडते. सध्या कडक उन्हाळा आहे. त्यात लॉक डाऊन मुळे मुले घरात बसून कंटाळतात मग सारखं काही तरी खायला मागतात. मग दुपारच्या वेळी थंडगार जेली त्यांना नक्कीच आवडेल. बाजारची आर्टिफिशल जेली बनवण्यापेक्षा घरी ओरिजनल पदार्थ वापरून मुलांना खायला दिली तर कोणताच अपाय होणार नाही. मग मुले ही खुश आणि मोठी ही खुश.
बघा करून एकदा.

कुकिंग सूचना
- 1
आंबे स्वच्छ धुवून साल काढून मिक्सर मधून थोडं पाणी घालून रस काढून घ्यावा.
- 2
एका पॅन मध्ये पाणी घेऊन त्यात अगर अगर घालून ते पाण्यात विरघळे पर्यंत हलवून घ्यावे. गॅसवर मध्यम आचेवर ठेवून दोन मिनिटे उकळवून घ्यावे. त्यात साखर घालावी नंतर त्यात आंब्याचा रस लिंबाचा रस घालून चांगले हलवून उकळी आल्यावर ट्रे मध्ये ओतावे. थंड करायला बाजूला ठेवावे.(अगर अगर पावडर ही जेली बनवण्यासाठी वापरतात इतरही पदार्थ बनवण्यासाठी वापरतात. ही पावडर सर्वच दुकानात मिळत नाही. पण ऑनलाईन मिळते)
- 3
- 4
आता नारळाच्या थरासाठी एका पॅन मध्ये पाणी घेऊन त्यात अगर अगर पावडर घालून ती वितळेपर्यंत पाणी ढवळून घ्यावे. गॅसवर मध्यम आचेवर दोन मिनिटे चांगली उकळी काढून त्यात साखर चिमूटभर मीठ आणि नारळाचे दूध घालून उकळी काढून घ्यावी. मी नारळाचे दूध घरी बनवले. तयार सुद्धा मिळते
- 5
- 6
ट्रे मधील आंब्याचा थर थंड होऊन सेट झाल्यावर नारळाच्या दुधाचे मिश्रण थोडे कोमट असताना त्याच्यावर पसरवावे. पसरवताना फोटोत दाखवल्या प्रमाणे नारळाच्या दुधाचे मिश्रण पसरवावे.
- 7
- 8
सेट करायला रूम टेम्परेचर मध्ये ठेवावे नंतर एक ते दोन तास फ्रीज मध्ये ठेवून हव्या त्या आकारात कापून सर्व्ह कराव्यात
- 9
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (8)