पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#cooksnap
#Supriya Tengadi
#पालक पनीर
सुप्रिया मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद सुप्रिया 🙂🙏

पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

#cooksnap
#Supriya Tengadi
#पालक पनीर
सुप्रिया मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद सुप्रिया 🙂🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी पालक
  2. 125 ग्रामपनीर
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 6-7लसूण पाकळ्या
  6. 4-5हिरवी मिरची
  7. 1-2 टीस्पूनलाल तिखट
  8. 1 टीस्पूनधने जीरे पूड
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. 1.5 टेबलस्पूनतेल /बटर
  11. चवीनुसारमीठ
  12. आवश्यकतेनुसार पाणी
  13. 1तमालपत्र
  14. 1/2 टीस्पूनजीरे

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम पालक स्वच्छ धून तो चिरून घेणे. नंतर कांदा, टोमॅटो चिरून घेणे. आता पालक 1 मिनिटे थोडया पाण्यात वाफवून घेणे. आता हा वाफवलेला पालक मिक्सर पॉट मध्ये घेऊन त्या मध्ये हिरवी मिरची घालून बारीक पेस्ट करून घेणे.

  2. 2

    आता कढई गॅस वर ठेवून त्यात थोडेसे तेल घालून कांदा, टोमॅटो, लसूण, आले छान सोनेरी रंगावर परतून घेणे. नंतर हे मिक्सर मधून याची पेस्ट करून घेणे.पनीर चे चौकनी तुकडे करून घेणे.

  3. 3

    आता त्याच कढई मध्ये भाजसाठी तेल घालावे तेल गरम झाले कि तमालपत्र आणि जीरे घालावे. आता या मध्ये कांदा, टोमॅटो पेस्ट घालून 2-3 मिनिटे तेल सुटेपर्यंत परतून घेणे. आता या मध्ये सगळे मसाले घालून छान 2 मिनिट परतून घेणे.

  4. 4

    आता या मध्ये पालक पेस्ट घालून सगळे एकत्र करून घेणे. आवश्यकतेनुसार पाणी घालावे.व त्या मध्ये पनीर घालून 4-5 मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घेणे. खूप पातळ भाजी करू नये. आता वरून आवडत असल्यास क्रीम घालावी. गॅस बंद करावा.

  5. 5

    मस्त पालक पनीर तयार झाले. गरम गरम फुलके किंवा पोळी सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes