आंबा वडी (amba vadi recipe in marathi)

#amr
आंब्याचा सिझन ...म्हणजे आंब्याच्या विविध रेसिपीज बनवायच्या आणि मनसोक्त ताव मारायचा...आणि वर्षभर पुन्हा वाट पहायची. काय काय करावे ......करावे तेवढे कमीच...कच्चा असो वा पिकलेला त्यापासून भरपूर टिकाऊ पदार्थ करून वर्षभर त्यांचा आस्वाद घेता येतो. असा हा बहुगुणी आंबा ....मीही आज आणखी एक आंबा वडीचा दुसरा प्रकार घेवून आले आहे..

कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईमध्ये खोबरे घालून २-३ मि. परतून घ्यावे, ज्यामुळे त्यातील ओलावा कमी होईल. नंतर त्यामध्ये साखर, आमरस व दूध घालावे. सर्व मिश्रण सतत हलवत रहावे. आता साखर विरघळून मिश्रण पातळ होईल.
- 2
आता ४ पेढे चुरून त्यामध्ये टाकावेत. तूपही घालावे.आता मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत रहावे.
- 3
मिश्रण घट्ट झाले, कडेने बुडबुडे दिसू लागले की वेलची पूड घालावी. मिक्स करावे.एका ताटाला तूप लावून त्यामध्ये मिश्रण काढावे. व ताटभर पसरवावे, सुक्या मेव्याचे काप घालावेत.जरा थंड झाले की वाटीच्या बुडाने थापावे व कोमट असतानाच हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्यात.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या