एग ड्रॉप करी (egg drop curry recipe in marathi)
#pe एक छान सोपी एग रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो बारीक कापून घ्यावे।
- 2
तेल गरम करून त्यात जीरे आणि पुढे कांदा घालून मिक्स करावे। आणि थोडे मीठ घालावे।
- 3
पुढे त्यात अद्रक लसूण पेस्ट आणि थोडे बारीक लसूण घालावे। आणि चांगले परतून घ्यावे। आता मिश्रण शिजल्यावर त्यात बारीक कापलेले टोमॅटो घालावे आणि मिक्स करावे।
- 4
आता टोमॅटो थोडे मुसमुशीत झाल्यावर त्यात कोमट पाणि घालून मिक्स करावे आणि झाकण लाऊन 5 मिन शिजू द्यावे।
- 5
शिजल्यावर त्यात मिरची पावडर, हळदी पावडर, धणे पावडर, गरम मसाला, आणि थोडा गोडा मसाला घालून मिक्स करावे।
- 6
पुढे त्यात थोडे ग्रेव्ही घट्ट झाल्यावर कोकोनट मिल्क घालावे(एक वाटी) आणि मिक्स करून घ्यावे।
- 7
आता गॅस मंद करून त्यात हळू हळू 4 एग फोडून टाकावे। आणि झाकण लावून 5-6 मिनिटे शिजू द्यावे। आता वरून थोडी कोथिंबीर घालावी।
- 8
आता गरम गरम प्लेट मधे काढून पोळी सोबत सर्व्ह करावे।
Keywords
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या