खेकडा भजी (khekda bhaji recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#KS6
#जत्रा/यात्रा
भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आजही एकविसाव्या शतकात जत्रेची लोकप्रियता टिकून आहे. जत्रा हे भारतीय ग्रामीण समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असून, या लोकप्रिय संस्कृतीची लोकप्रियता आपल्याला महाराष्ट्रातील घराघरात भिंतीवर टांगून ठेवलेल्या दिनदर्शिके वरील गावोगावच्या जत्रे विषयक दिलेल्या माहितीवरून लक्षात येते. जत्रा ही सामाजिक, सांस्कृतिक इतिहास सांगणारे महत्त्वाचे स्त्रोत आहे..
वेगवेगळ्या कबरी, समाधी, शीलालेख, जुने मंदिर, संगम, राजाचे थडगे अशा स्थानाजवळ जत्रा भरली जाते.
जत्रा चा कालावधी दोन दिवसापासून ते 15 दिवसांपर्यंत असतो. गाव जत्रेची संस्कृती ही अत्यंत लोकप्रिय सांस्कृतिक व्यवहार असून, ती महाराष्ट्रात व भारतात सर्वत्र आढळून येते. जत्रेच्या काळात त्या त्या देवतेचे विशेष पुजोपचार होतात...
मैत्रिणींनो जत्रा म्हंटली की खाद्यपदार्थांची रेलचेल ही असतेच असते. जत्रेमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद त्या-त्या जागेनुसार तिथल्या खाद्य संस्कृतीनुसार आपल्याला घेता येतो. पण कुठलीही जत्रा असो, तिथे एक कॉमन पदार्थ हा असतोच असतो आणि तो म्हणजे *खेकडा भजी* .. जत्रेतील गरमागरम खेकड्या भज्याची मजा काही औरच असते.
नाही का..
चला तर मग करूया *खेकडा भजी*... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 5-6मोठे कांदे
  2. 1 कपबेसन
  3. 1/4 कपतांदूळाचे पिठ
  4. 1-2 टेबलस्पूनतिखट
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1/4 टीस्पूनओवा
  7. 1/2 कपकोथिंबीर चिरलेली
  8. 4-5हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  9. 7-8कढीपत्ताची पाने (ऑप्शनल)
  10. 1 पिंचखाण्याचा सोडा
  11. आवश्यकतेनुसार पाणी
  12. मीठ चवीनुसार
  13. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    कांदे सोलून घ्यावी व त्याचे पातळ पातळ उभे काप करून कांद्यांना मोकळे मोकळे करून घ्यावे.

  2. 2

    या कांद्याला आता कोथिंबीर, मीठ, हिरवी मिरची चे काप, व कडीपत्ता घालून चांगले मिक्स करून, अर्धा तास झाकून ठेवावे. (असे केल्याने कांद्याला चांगले पाणी सुटते)

  3. 3

    एका वाटी मध्ये बेसन, तांदळाचे पीठ, तिखट, मीठ, चिमूटभर सोडा, ओवा घालून चांगले मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    कांद्याला पाणी सुटले की त्यात गरजेप्रमाणे वरील पिठ घालावे. साधारण पाच ते सहा टेबलस्पून बेसन पिठ लागेल.कांद्यामध्ये हे पिठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. (यामध्ये अधिकचे पाणी घालू नये. पण लागलेच तर तीन ते चार टेबलस्पून पाणी घालावे. कांद्याला सुटलेल्या पाण्यातच पिठ घट्टसर भिजवावे. तसेच खूप जास्त बेसन पिठ हि घालू नये.)

  5. 5

    गॅस वर पॅन ठेवून त्यात तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे मोकळे भजी सोडावीत. व चांगले खंमग तळून घ्यावीत.

  6. 6

    तयार *खेकडा भजी* तळलेल्या मिरच्या सोबत व गरमागरम चहा सोबत सर्व्ह करावे... 💃 💕

  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes