आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm
आम्रखंड ची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करतेय.
आज बर्याच दिवसांनी रेसिपी शेअर करते घरगुती प्रॉब्लेम मुळे मला नवीन रेसिपी लिहिता आल्या नाहीत. तर माझी रेसिपी नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm
आम्रखंड ची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करतेय.
आज बर्याच दिवसांनी रेसिपी शेअर करते घरगुती प्रॉब्लेम मुळे मला नवीन रेसिपी लिहिता आल्या नाहीत. तर माझी रेसिपी नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक लिटर दूध घेऊन ते तापवून मलाई सकट त्याचे दही बनवून घेतले. त्यानंतर ते दही एका मलमलच्या कापडाने मध्ये घालून साधारण चार ते पाच तास बांधून ठेवले. दह्यातील सर्व पाणी निघून गेल्यावर घरच्या घरी छान चक्का तयार होतो. दोन आंब्याचा गर काढून तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.
- 2
साधारण 2 टीस्पून गरम दुधामध्ये केशर काड्या घालून ठेवणे. तयार झालेला चक्का मी बारीक चाळणी मध्ये घालून तो गाळून घेतला त्यामुळे आपले आम्रखंड एकसारखे होते. मग त्यामध्ये पिठीसाखर व आपण बनवलेले केसर दूध मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये आंब्याचा रस ॲड करावा.
- 3
मग हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करुन घ्यावे यामध्ये मी वेलचीपूड नाही घातली कारण मला त्यामध्ये ती नाही आवडत जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही वेलचीपूड ऍड करू शकता. पिठीसाखर आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त अड्जस्ट करावी. आता हे तयार झालेले आम्रखंड फ्रिज मध्ये साधारण दोन तास ठेवून द्यावे.
- 4
दोन तासानंतर त्यामध्ये मी फ्रेश आंब्याच्या फोडी व पिस्ता घालून सर्व केले.
Keywords
Similar Recipes
More Recipes






टिप्पण्या