कुकिंग सूचना
- 1
तांदुळ व उडीद डाळ मेथीदाणे घालून भिजवून मिक्सरवर वाटून घ्यावी.रात्रभर झाकून ठेवून आंबवून घ्यावे..उत्तपम् बनवतांना त्यामध्ये मीठ घालावे व हळूवार हाताने ढवळून घ्यावे.मिश्रण पातळसरच असावे.
- 2
आता निर्लेपचा तवा गॅसवर ठेवून गरम झाल्यावर बटर घालावे व पळीने गोल आकारात उत्तप्पम् घालावे.बाजूने बटर सोडावे..बटर मध्ये केलेले उत्तप्पम् चवीला खूप छान लागतात..वरून टाॅपींगसाठी टोमॅटो,कांदा,कोथिंबीर घालून लालतिखट जीरे पुड व मीरेपुड घालावी.झाकण ठेवून वाफवावे..आवडत असल्यास मॅगी मसाला घालावा.मी घालते, छान लागतो.
- 3
आपले टेस्टी टेस्टी बटर उत्तप्पम् तयार आहेत...सांभर व चटणी सोबत सर्व्ह करावा..
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15345178







टिप्पण्या