नारळी भात (Coconut rice recipe in marathi)
नारळी भात (Coconut rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
लागणारे साहित्याचे फोटो.
अगोदर तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यायचे. तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता. मी आंबेमोहर तांदूळ वापरली आहे कारण त्याचे खूप छान सुगंध येते. - 2
कढई किंवा कुकर मध्ये तूप गरम करायचं.
त्यात काजू व बेदाणे तळून एका वाटीत काढून घ्यायचे, त्यानंतर लवंग आणि वेलची घालायची, वेलची फुगून आले की तांदूळ घालायचे आणि परतून घ्यायचे, त्यात नारळाचे दूध घालायचे आणि लो गॅस फ्लेमवर भात शिजवून घ्यायचे. - 3
भात शिजे तोवर गुळ मऊ करून खोबऱ्याचे कीस मध्ये मिक्स करावे. जायफळ किसून केव्हा वाटून घेऊ शकता.
- 4
भात शिजला की त्यात गुळ खोबरं चे मिश्रण घालून हलक्या हाताने मिक्स करायचे.
नंतर जायफळ, विलायचीचे पूड, बेदाणे आणि केसर चे दुध घालून परत हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे व झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ आणुन घ्यायचे. - 5
आपला नारळीभात तयार झाला आहे.
नारळाच्या दुधात भात शिजवल्या मुळे याची चव अप्रतिम लागते
Keywords
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या