कुरकुरे भेंडी (kurkure bhendi recipe in marathi)

#shr श्रावण स्पेशल रेसिपीज साठी मी ही माझी रेसिपी तुमच्याशी शेअर करते आहे. माझ्या घरातील सर्वांनाच ही डिश खूप आवडते. तुम्ही करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल

कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी स्वच्छ धुऊन घ्या आणि नितळ ठेवा
- 2
आता भेंडी पातळ लांबट चिरून घ्या. चिरताना भेंडीच्या बीय काढून घ्या. कोवळया भेंडीत शक्यतो बिया नसतात
- 3
आता कढईत तेल गरम करून घ्या. एका वाटीत सर्व मसाले एकत्र करून घ्या. तेल गरम झाल्यावर एका प्लेटमध्ये थोडी भेंडी घ्या त्या भेंडीवर मिक्स केलेले मसाले टाकून एकत्र करून घ्या
- 4
1 वाटीत लिंबू पिळून घ्या. लिंबुचा रस मसाला लावलेल्या भेंडीवर घाला व मिक्स करून घ्या. 2 चमचे पाणी घालून परत एकदा हलवा
- 5
गरम झालेल्या तेलात पसरून टाकून मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्या. सर्व भेंडीला एकदम मसाला लावू नका नाही तर भेंडी नरम पडते. कुरकुरीत होत नाही
- 6
वर दिलेल्या प्रमाणे सर्व भेंडी तळून घ्या. श्रावणात अश्या वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवल्या की भाज्यां खाण्याचा कंटाळा येत नाही
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)