विदर्भ स्पेशल कोहळ्याची खीर (गुळशेलं) (kohlyachi kheer recipe in marathi)

Sandhya Deshmukh @4567vijayd
#shr
# श्रावण स्पेशल रेसीपी
विदर्भ स्पेशल कोहळ्याची खीर (गुळशेलं) (kohlyachi kheer recipe in marathi)
#shr
# श्रावण स्पेशल रेसीपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोहळ्याची साल काढून कीसून घ्यावे.दुध आटवायला ठेवायचे.कढईमध्ये तुप घालून गरम झाल्यावर कोहळ्याचा कीस घालायचा.छान मऊ शिजू द्यायचा.
- 2
थोड्या थंड दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करून ठेवायचे व उकळत्या दुधात घालायचे, पुन्हा थोडा वेळ उकळून गॅस बंद करायचा.कीस शिजला की त्यात गुळ घालायचा,थोडे पाणी सुटेल,मिश्रण घट्ट करून घ्यायचे.
- 3
त्यामध्ये आटवलेले, मिल्कपावडर मिक्स केलेले दुध,ड्रायफ्रूट व विलायची पुड घालायची.
- 4
आपली कोहळ्याची खीर तयार आहे.गरम कींवा थंड सर्व्ह करायचे.खूप छान लागते चवीला आणि खूपच पौष्टीक अशी ही खीर कींवा गुळ शेलं..विदर्भात या खीरीला गूळशेलं म्हणतात.
- 5
ही खीर उपवासाला पण चालते.
आज संकष्टी आहे, बाप्पाला नैवेद्य म्हणून ही खीर बनवली आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15426151
















टिप्पण्या (2)