इन्स्टंट केसर-मिल्क पेढा (instant kesar milk peda recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#shr
श्रावण महिना म्हणलं की सणवार आलेच आणि सणवार आले की नेवेद्य साठी गोड करणं आलेच ,त्यात आज श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी मग आज बाप्पाच्या नेवेद्य साठी मी इन्स्टंट पेढा बनवला तर मग पाहुयात रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
11 पेढे
  1. 1 कपमिल्क पावडर
  2. 1/2 कपमिल्कमेड
  3. 1/4 कपदूध
  4. 2 चमचेतूप
  5. 1/2 चमचावेलचीपूड
  6. 10-12केसर काड्या
  7. 7-8सजावटीसाठी पिस्ता

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग एक नॉन स्टिक पॅन मध्ये एक चमचा तूप घालून तो गॅसवर ठेवा तो तापला की त्यात मिल्कमेड घाला

  2. 2

    मग त्यात हळु हळु करत मिल्क पावडर घाला व मिश्रण हालवत रहा,दुधामध्ये केसर काड्या घालून ते दूध पॅन मधील मिश्रण मध्ये घाला व सगळं छान मिसळून घ्या थोडं घट्ट झाले की त्यात राहिलेलं 1 चमचा तूप व वेलचीपूड घाला

  3. 3

    मिश्रण 5 मिनिटांमध्ये गोळा होईल गॅस बंद करा मग पॅन खाली उतरून मिश्रण थंड होऊ द्या,मग एक टी स्पून ने त्याचे समान गोळे बनवून घ्या व ते हाताने मळून त्याचा पेढा बनवून वरून पिस्ता व केसर लावून घ्या

  4. 4

    बाप्पा च्या नेवेद्य साठी इन्स्टंट केसर-मिल्क पेढा तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या (2)

Similar Recipes