मेथीची भाजी बाजरीची भाकरी (methichi bhaji bajarichi bhakhri recipe in marathi)

#mfr
बाराही महिने जर मला कुठली भाजी आवडत असेल तर ती म्हणजे मेथीची भाजी.मेथीची भाजी ,बाजरीची भाकरी सोबत चटणी,ठेचा,कांदा काहीही चालेल.... माझं मन तृप्त 😋😋👍

कुकिंग सूचना
- 1
मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली.कांदा,मिरची,सोळलेला लसूण चिरून घेतला.
- 2
कढईत तेल घालून ते तापल्यावर जीरे, मोहरी तडतल्यावर त्यात लसूण घातला.तो लाल झाल्यावर कांदा परतून घेतला.
- 3
त्यात हिंग,हळद घालून त्यावर मेथीची धुतलेली भाजी घालून मिक्स केले.मंद आचेवर पाच मिनिटे वाफ काढली.नंतर मीठ घालून मिक्स केले.
- 4
भाकरीसाठी बाजरीचे पीठ घेतले.त्यात मीठ घालून मिक्स केले.कोमट पाणी घालून पीठ भिजवले.
- 5
पोळपाटावर भाकरी थापून किंवा लाटून घेतली.
- 6
तव्यावर भाकरी घालून त्यावर पाणी लावले.ते सुकल्यावर भाकरी उलटून घेतली.शेवटी गॅसवर भाकरी भाजून घेतली.
- 7
गरम गरम भाकरी,मेथीची भाजी आणि तिळाची चटणी...एकदम झकास बेत झाला.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)