कुकिंग सूचना
- 1
१ कप पंढरपुरी डाळ आणि २ कप गावठी पोहे कढईत थोडे गरम करून घेतले. थंड झाल्यावर मिक्सर ला बारीक पूड केली. त्यात २ कप तांदळाचं पीठ, २ चमचे धणेपूड, २ चमचे पांढरे तिळ, १ चमचा ओवा, चवीनुसार मीठ, १ चमचा हळद, २ चमचे लाल तिखट, १ चमचा काश्मिरी मिरची पावडर (रंगासाठी) मिक्स करून मिश्रण सुकंच ढवळून घेतलं.
- 2
२ कप पाणी गरम करून पिठात हळू हळू मिक्स केलं. पीठ व्यवस्थित मळून घेतलं. मळलेल्या पिठाचे लांबट गोळे करून चकली पात्रात घातले आणि चकल्या करून घेतल्या.
- 3
कढईत तेल गरम करून कमी ते मध्यम आचेवर चकल्या खरपूस तळून घेतल्या. खुसखुशीत पोह्यांच्या चकल्या तयार. :)
~ सुप्रिया घुडे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15675138













टिप्पण्या (2)