सांजोरी (sajori recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#dfr
#दिवाळी फराळ चॅलेंज

सांजोरी (sajori recipe in marathi)

#dfr
#दिवाळी फराळ चॅलेंज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. 1/4 किलोखवा
  2. 1/4 किलोबारीक रवा
  3. २०० ग्रॅम पीठी साखर
  4. 3 टेबलस्पूनसाजूक तूप
  5. 1 टीस्पूनवेलचीपूड
  6. 1/4 कपदूध (रवा मुरण्यापुरते अंदाजे)
  7. कव्हरसाठी..
  8. १/४ किलो मैदा
  9. १२५ ग्रॅम बारीक रवा
  10. 2 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  11. 2 टेबलस्पूनसाजूक तुपाचे मोहन
  12. 1/4 टीस्पूनमीठ
  13. तळण्यासाठी साजूक तूप

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम सांजोरी चे सारण तयार करण्यासाठी गॅस वर पॅन मध्ये तुपावर रवा भाजून घेतला. मग तो एका डिशमध्ये काढून परत थोड्या तुपावर खवा परतून घेतला.

  2. 2

    दोन्ही गोष्टी थंड झाल्यावर त्यामध्ये त्यामध्ये पिठीसाखर व वेलची-जायफळ पूड मिक्स केली आणि गरजेनुसार थोडे निरस दूध घालून मिश्रण ६-७ तास झाकून ठेवले. दूध साधारण मिश्रण ओलसर होईल इतपत लागते.

  3. 3

    आता कव्हर करण्यासाठी एका पराती मध्ये रवा मैदा चाळून घेतले. त्यात कॉर्नफ्लोअर, थोडंसं मीठ व तुपाचे मोहन घालून चांगलं मळून घेतलं. मग त्यात गरजेनुसार दूध घालून थोडा सॉफ्ट तयार केला. व तो फूड प्रोसेसर मधून काढून घेतला. म्हणजे कव्हर छान होते.

  4. 4

    आता सारणाचे मिश्रण चांगले एकजीव करून त्याचे लहान लहान लाडू सारखे गोळे बनवले. मग त्याच मापाचे मैद्याचे गोळे बनवून त्यातील एक गोळा घेतला व तो लाटून त्यात वरील सारणाचा गोळा स्टफ केला व सांजोरी लाटून घेतली.

  5. 5

    आता सांजोऱ्या लाटून झाल्यावर त्या गॅस वरील गरम तुपात मध्यम आचेवर खरपूस तळून घेतल्या व डीश मध्ये ठेवून साजूक तुपाबरोबर सर्व्ह केल्या.

  6. 6

    सांजोऱ्या खूपच टेस्टी व खुसखुशीत होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes