कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांगी कट करून पाण्यात ठेवून द्यावे.
- 2
मिक्सरमध्ये भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण पाकळ्या घालून बारीक वाटून घ्यावे.
- 3
प्लेटमध्ये बारीक चिरलेला कांदा,वाटलेला मसाला,काळ तिखट,लाल तिखट, हळद, मीठ घालून मिक्स करावे.
- 4
तयार मसाला सर्व वांग्या मध्ये भरून घ्या.
- 5
कढईत तेल गरम करून मोहरी, जीरे, हिंग घालून फोडणी करून त्यात भरलेली वांगी घालून मिक्स करा. पातळ किंवा घट्ट कसे हवे आहे त्यानुसार पाणी घालावे.
- 6
झाकून वांगी शिजेपर्यंत शिजवून घ्यावे. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- 7
तयार भरली वांगी ज्वारीच्या भाकरी किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15740485



















टिप्पण्या (2)