भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi)

Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07

#EB2
#W2

विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुक

भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi)

#EB2
#W2

विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-३५ मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 300 ग्रामभेंडी
  2. 2मोठी कांदे
  3. 2मोठे टोमॅटो
  4. 1/2 वाटीओले खोबरे
  5. 4 चमचेतेल
  6. 2 चमचेतिखट
  7. 1 चमचाहळद
  8. 2 चमचेगरम मसाला
  9. 1 चमचासब्जी मसाला
  10. 2 चमचेदही
  11. 1 चमचाधने जीरे पावडर
  12. चवीनुसारमीठ
  13. 1 वाटीगरम पाणी

कुकिंग सूचना

30-३५ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम भेंडी स्वच्छ धुऊन घेऊन थोडे मोठ्या मोठ्या भागातच चिरून घ्यावी त्यानंतर हळद आणि तिखट घालुन घ्यावी कढई मध्ये थोड्या तेलावर परतून बाजूला ठेवावी कांदा कापून घ्यावा.

  2. 2

    भेंडीच्या भाजी साठी आपण रेस्टॉरंट स्टाईल मसाला करणार आहे तो कसा ते पहा... ग्राइंडर मध्ये टोमॅटो,ओला नारळ, कांदा याची पेस्ट करून घ्यावी आणि त्यातच आले-लसूण देखील टाकावे. आता कढईमध्ये तेल घेऊन ते छान तापले की त्यावर ती बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा.

  3. 3

    कांदा छान खरपूस तळला की त्यामध्ये तयार ग्रेव्ही घालावी त्यानंतर सब्जी मसाला, गरम मसाला, तिखट घालून व्यवस्थित हे मिश्रण शिजू द्यावे

  4. 4

    या भाजीचा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे दही... गॅस सर्वात कमी फ्लेम वर असेल याची काळजी घ्यावी,आणि दही घालावे. परतून घेतलेली भेंडी त्यामध्ये घालावी व मिश्रण एकत्र करावे आणि चवीनुसार मीठ घालावे त्यानंतर भाजीची मसाला सोबतची कन्सिस्टन्सी बघूनच त्यामध्ये एक पेला गरम पाणी घालावे.

  5. 5

    तयार आहे चवीला अप्रतिम अशी लागणारी भेंडीची भाजी.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07
रोजी
Royalty of Taste - Delish Masala
पुढे वाचा

Similar Recipes