सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)

Manisha Shete - Vispute @manisha1970
सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घ्यावे. सोयाबीन ५-६ तास भिजत घालावे.
- 2
कुकरमध्ये सोयाबीन शिजवून घ्यावे. कांदा,आलं, खोबरं, काजू, लसूण थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटावे. टोमॅटो प्युरी करावी.
- 3
कढईत तेल गरम झाल्यावर जीरे तडतडावे. कढीपत्ता घालून वाटण परतावे. तेल सुटले की, मसाले-हळद, तिखट, गरम मसाला, धणे जीरे पूड टाकून परतून घ्यावे.
- 4
टोमॅटो प्युरी व मीठ घालून चांगले परतून घ्यावे. शिजलेले सोयाबीन घालून चांगली उकळी घ्यावी. पातळ आवडीनुसार कमी-जास्त करावी. वरुन कोथिंबीर घालावी. पौष्टिक सोयाबीन भाजी तयार.
- 5
चपाती,भाकरी,रोटी,भात बरोबर खायला द्या.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15769480














टिप्पण्या (2)