सुरती अंडा घोटाळा (anda ghotala recipe in marathi)

" सुरती अंडा घोटाळा "
अंडा घोटाळा, म्हणजे आवडता विषय, त्यात सुरती अंडा घोटाळा खायची मजाच खूप येते, सगळ्या फ्लेव्हर्स ने भरपूर असा हा अंडा घोटाळा माझ्या घरी सर्वांना आवडतो...👌
सुरती अंडा घोटाळा (anda ghotala recipe in marathi)
" सुरती अंडा घोटाळा "
अंडा घोटाळा, म्हणजे आवडता विषय, त्यात सुरती अंडा घोटाळा खायची मजाच खूप येते, सगळ्या फ्लेव्हर्स ने भरपूर असा हा अंडा घोटाळा माझ्या घरी सर्वांना आवडतो...👌
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी एका कढई मध्ये तेल गरम करून त्यात कांदा फ्राय करून घ्या,नंतर त्यात टोमॅटो घालून मऊ होई पर्यंत परतून घ्या,त्यात सर्व मसाले,चवीनुसार मीठ,घालून व्यवस्थित परतून घ्या, त्यात आलं आणि मिरची ची पेस्ट घालून मस्त शिजवून घ्या
- 2
आता या मिश्रणात उकडलेली अंडी बारीक चिरून टाका, आणि गरजेनुसार पाणी घालून मिश्रण एकजीव करा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण परत एकदा एकजीव करा,आणि बाजूला ठेवून द्या
- 3
आता कच्ची अंडी फोडून घ्या त्यात चवीनुसार मीठ घालून फेटून घ्या, आणि गरम तव्यावर थोडं तेल घालून अंड्याचे मिश्रण घालून ऑम्लेट करून घ्या त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काळीमिरी पूड पण घालू शकता, ऑम्लेट दोन्ही बाजूनी शिजवून घ्या,
- 4
आणि ऑम्लेट एका प्लेट मध्ये काढून घ्या, आणि त्यावर उकडलेल्या अंड्याचे मिश्रण घालून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा,"सुरती अंडा घोटाळा" पावा सोबत किंवा नान फुलका या सोबत भन्नाट लागतं....👍👍👌👌
Keywords
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या (2)