ओरिओ कप केक (क्रीमी डेझर्ट) (oreo cup cake recipe in marathi)
#EB4 #W4
केक ही गोष्ट सर्वांनाच खूप आवडते, मुलांना तर जास्तच. आजची रेसिपी अगदी दोन मिनिटात होणारी रेसिपी आहे, ज्यामध्ये साहित्यही खूप कमी वापरले आहे. घरात कोणी अचानक पाहुणे आले आणि डेझर्ट सर्व्ह करायचे असेल तर हा केक खूप पटकन होतो. या केकला अजून छान टेस्ट देण्यासाठी व्हाइट चॉकलेट, फ्रेश क्रीम आणि चॉकलेट चा वापर केला आहे. मुलांना आवडेल असा हा क्रीमी केक नक्की ट्राय करा...

कुकिंग सूचना
- 1
ओरियो बिस्किटे मिक्सर मधून फिरवून बारीक करून घ्या. त्यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालून मिक्स करून घ्या. या मिश्रणामध्ये हळूहळू करून अर्धा कप (गरज पडल्यास १-२ टेबलस्पून जास्त) दूध घालून खूप दाट नाही, असे मिश्रण बनवा.
- 2
मायक्रोवेव मध्ये बेक करता येतील अशा कप मध्ये हे मिश्रण ओतून घ्या. कपचा अर्ध्या पर्यंतच मिश्रण घाला. मायक्रोवेव्हमध्ये हे केक एक ते दीड मिनिटासाठी मायक्रोवेव करा (तुमच्या मायक्रोवेव प्रमाणे वेळ ऍडजेस्ट करा)
- 3
तयार झालेले कपकेक बाहेर काढून पूर्ण थंड करा. दुसऱ्या एका कप मध्ये व्हाईट चॉकलेट किसून त्यामध्ये अमुल फ्रेश क्रीम घालून ते मिश्रण मायक्रोवेव मध्ये दोन- दोन मिनिटे असे गरम करून वितळवून घ्या. हे मिश्रण तयार केकवर घालून थंड झाल्यावर त्यावर डेरी मिल्क चॉकलेट किसून घाला. अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये मस्त क्रीमी ऑरिओ कप केक तयार...
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या