झणझणीत कोल्हापुरी मटण खिमा (mutton kheema recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

झणझणीत कोल्हापुरी मटण खिमा (mutton kheema recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे.
  1. ७०० ग्रॅम मटण खिमा
  2. 4कांदे
  3. 2टोमॅटो
  4. २०-२५ लसूण पाकळ्या
  5. 3-4 आले चे तुकडे
  6. 2तेज पत्ता
  7. 2लवंग
  8. 1 तुकडादालचिनी
  9. 2मसाला वेलची
  10. 3हिरव्या वेलची
  11. 1 टीस्पूनजीरे
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 2 टेबलस्पूनतूप
  14. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  15. 2 चिमूटजायफळ पूड
  16. 4काळीमिरी
  17. बारीक चिरलेली कोथिंबीर
  18. 1 टीस्पूनगरम मसाला
  19. 2 टीस्पूनधणे पूड
  20. 1 टीस्पूनजीरे पूड
  21. 2 टीस्पूनहळद
  22. चवीनुसारमीठ घालावे
  23. 1 टीस्पूनलाल तिखट

कुकिंग सूचना

४५ मिनिटे.
  1. 1

    प्रथम आपण खिमा स्वच्छ धुवून घ्यावे मग त्यात हळद व मीठ घालून मिक्स करून घ्यावे मग एक कढ ईमधे तूप गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे मग त्यात खिमा घालून परतावे थोड्या वेळ परतून झाल्यावर त्यात गरम पाणी घालून झाकण ठेवून शिजू द्यावे नंतर आलं, लसूण पेस्ट करून घ्यावे मग कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक चिरून घ्यावे...

  2. 2

    नंतर दुसऱ्या एका कढईमध्ये तूप घालून त्यात जीरे, तेजपता, वेलची, लवंग दालचिनी, काळीमिरी, मसाला वेलची, हे सर्व थोडे परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदे घालून परतावे.

  3. 3

    मग त्यात आले लसूण पेस्ट घालून परतावे नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतावे थोड्या वेळ परतून झाल्यावर त्यात सर्व मसाला व चवीनुसार मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावे मग त्यात खिमा घालून थोडे गरम पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे. आपला झणझणीत कोल्हापुरी मटण खिमा तयार आहे एक वाटी मध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर

  4. 4

    व लिंबू घालून गरम गरम पाव बरोबर सर्व्ह करावे मस्त 😋😋😋👍
    तुम्ही आवडीनुसार मसाला कमी जास्त प्रमाणात वापरू शकता...

  5. 5

    टीप... कुठल्याही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होतात...👌👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

Top Search in

Similar Recipes