शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम लाल मिरचीचे दोन भाग करून त्यातील बिया काढुन घ्या. आता त्या लाल मिरच्या गरम पाण्यात ५ -१० मिनिटे भिजवून ठेवा. तुम्हाला जर घाई नसेल तर १ तास भिजवून ठेवू शकता. आता मिरच्या ५-१० मिनिटे उकडून घ्या.
- 2
मिरच्या आता उकळून झाल्या आहेत त्याला थोडा थंड होण्याकरता ८-१० मिनिटे झाकून ठेवा. आता मिरच्या थंड झाल्या आहेत. मिरच्या मिक्सर मध्ये टाकून थोडे जाडसर वाटून घ्या.त्याचं पाणी वाया जाऊ न देता चटणी घट्ट किंवा पातळ करण्यासाठी वापर होतो.
- 3
आता चटणी चांगली वाटून झाली आहे.गॅसवर कढई ठेवून कढई गरम झाली का गॅस मंद आचेवर ठेवून त्यामध्ये ६-७ टेबलस्पून तेल(तेल याकरता जास्त टाकायचं की चटणी जास्त दिवस टिकते) लसुन,अद्रक व ५-६कोथिंबिरीच्या काड्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या टाका. हे सर्व साहित्य ३-४ मिनिटे तेलात फ्राय करून घ्या आणि नंतर त्यात बारीक केलेली चटणी घालून पुन्हा एकदा मंद आचेवर ५-७ मिनिटे परतून घ्या. परतून झाले की त्यात आपण जे मिरच्या उकळलेले पाणी होते ते कढई मध्ये टाकून आपल्याला हवी तेवढी चटणी घट्ट किंवा पातळ करून घ्या.
- 4
चटणी चांगली फ्राय झाली आहे हेआपल्याला कळून येतच कारण आपण रोजच्या भाज्यांमध्ये तेलामधे तिखट टाकल्यावर ते समजतच की तिखटाला जर तेल सुटलं तर मग चटणीही चांगल्या प्रकारे फ्राय झाली आहे.आता त्यात मीठ,साखर,व्हिनेगर व चटणी जर घट्ट करायची असेल त्यात तुम्ही थोडंसं कॉर्न फ्लावर पाण्यामध्ये मिक्स करून टाकू शकता.
- 5
चटणी आता आपल्याला हवी तेवढी घट्ट करून घ्या. शेजवान चटणी आता तयार आहे थंड झाली कि बरणीमध्ये स्टोअर करून आठ ते पंधरा दिवस खाऊ शकतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes




टिप्पण्या