मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)

मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मोड आलेल्या मटकीला धुवून, हळद, मीठ पाणी घालून कुकर मधून २ शिट्या काढून घ्याव्यात किंवा डायरेक्ट वाटणं सोबत शिजवून घेतले तरी चालते..
- 2
वाटनासाठी: कढयीत थोड तेल घेऊन त्यावर चिरलेला कांदा घालून लाल होईपर्यंत परतून, आले, लसूण घालून छान परतावा. मग त्यात टोमॅटो घालून सगळ 5 मिन परतून घ्यावं. हे मिश्रण थंड करून मिक्सर वर वाटताना त्यात काजू आणि कोथिंबीर घालून वाटावं..
- 3
त्याच कढयीत फोडणीसाठी तेल घेऊन त्यात वेलची आणि दालचिनी चा तुकडा घालून थोडा परतून त्यात वाटण घालावे. त्ते तेलात छान परतून त्यातच लाल तिखट, हळद, गरम मसाला घालून छान परतून मग त्यात गरम पाणी घालावे..त्याने मिश्रणाला कट छान येतो. त्यात शिजवलेली मटकी घालवी. वाटल्यास अजून थोड पाणी घालावं...आणि वरून मीठ आणि लिंबू रस घालावा आणि छान उकळी काढून घ्यावी..आणि गरमागरम भाकरी किंवा राइस सोबत सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes



टिप्पण्या