मटार भात (matar bhat recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#EB8
#W8
#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge
#मटार_भात
हिवाळ्यात आठवड्यातून एकदा तरी मटार भात करणे आणि तो ही वेगवेगळ्या पद्धतीने..तयार झालेला गरमागरम वाफाळता पहिल्या वाफेचा मटार भात त्यावर ओलं खोबरं, कोथिंबीर, तुपाची धार,सोबत लिंबाची फोड,पापड,एखादं लोणचं आणि ताक...सुख सुख म्हणजे काय तर ते हेच हो....😍..जगणयासाठी अशी छोटी छोटी सुखं मग तो एखादा खमंग ,सुंदर पदार्थ असो,एखादी आवडत्या गाण्याची लकेर असो,निसर्गाचे स्तिमित करणारे दृश्य असो,एखादं appreciation असो,मित्रमैत्रिणींची मस्करी असो किंवा आवडत्या व्यक्तीच्या तोंडून आलेला एखादा शब्द असो..जगण्यासाठी हुरुप देतात..अनमोल असतात ही छोटीशी सुखं..😊ती वेचायची असतात आणि आपल्या पदरात घट्ट बांधून ठेवायची असतात.. यातूनच आपल्यात positivity पाझरु लागते..मगच आपण आपल्या सभोवताली एखादी आनंदाची झुळूक का होईना पसरवू शकतो..😍 बरोबर ना..चला तर मग हा सुखाचा सरंजाम समोर ताटात विराजमान करु या..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे
4जणांना
  1. 2 कपआंबेमोहोर तांदूळ किंवा कोणताही
  2. 1 कपमटार
  3. 2 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  4. 7-8कडिपत्ता पाने
  5. 1 टीस्पूनआल्याचे तुकडे
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. मीठ चवीनुसार
  8. 2 टीस्पूनधणे पावडर
  9. 1/4 कपदही
  10. 1/4 कपकाजू तुकडे
  11. फोडणीकरता तेल मोहरी जीरे हिंग हळद
  12. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  13. ओलं खोबरं
  14. कोथिंबीर
  15. 1 टीस्पूनलाल तिखट
  16. 3-4हिरव्या मिरच्यांचे तुकडे

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    सर्व प्रथम मटार भातासाठी लागणारे सर्व साहित्य एकेठिकाणी काढून घ्या.तांदूळ धुऊन ठेवा.

  2. 2

    आता प्रेशर पॅन मध्ये तेल घाला.तेल तापले की त्यात मोहरी हिंग जीरे हळद घालून खमंग फोडणी करा. नंतर यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर आल्याचे तुकडे मिरच्यांचे तुकडे आणि आलं लसूण मिरची पेस्ट घालून दोन मिनिटे परता.नंतर यामध्ये मटार घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या.आता यामध्ये धुतलेले तांदूळ घालून छान परतून घ्या.

  3. 3

    आता यामध्ये तिखट,जीरे पावडर,साखर, दही घालून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्या.आता यामध्ये गरम पाणी घालून एक वाफ येऊ द्या.नंतर काजू,तूप आणि मीठ घालून ढवळून घ्या आणि झाकण लावून कुकरच्या दोन तीन शिट्ट्या काढा.

  4. 4

    तयार झाला आपला खमंग चमचमीत मटार भात एका डिश मध्ये मटार भाताची मूद पाडून वरून खोबरं कोथिंबीर घाला आणि लोणचं पापड दही याबरोबर सर्व्ह करा..

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes