कुकिंग सूचना
- 1
सुरमईचे पीस स्वच्छ धुऊन त्याला चिंचेची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट लावून घ्या. आणि दहा मिनिटासाठी मॅरिनेट करत बाजूला ठेवा.
- 2
एका प्लेट मध्ये लाल तिखट, गरम मसाला,हळद आणि मीठ एकत्र करून घ्या. दुसऱ्या प्लेट मध्ये तांदळाचं पीठ आणि थोडंसं मीठ मिक्स करून घ्या.आधी सुरमईच्या पीस ला तयार मसाला लावून घ्या.
- 3
नंतर सुरमईचे पीस तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्या. पिठाचे कोटिंग सगळ्या बाजूंनी व्यवस्थित सुरमईच्या पिसला लावून घ्या. पॅनवर तेल गरम करून मध्यम आचेवर सुरमईचे तीस तळण्याकरता ठेवा.
- 4
तीन ते चार मिनिटे मध्यम आचेवर दोन्ही बाजूने सुरमईचे पीस फ्राय करून घ्या. व नंतर पुन्हा तीन ते चार मिनिटे मंद आचेवर पीस दोन्ही बाजूने फ्राय करून घ्या. गरमागरम सुरमय फ्राय चपाती,भाकरी किंवा वरण भातासोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15925555















टिप्पण्या (2)