कुळीथ चे इडली आणि डोसे (kulith che idli ani dosa recipe in marathi)

Shubhangee Kumbhar @shubhangee_99
कुळीथ चे इडली आणि डोसे (kulith che idli ani dosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कुळीथ निवडुन स्वच्छ धुवून घ्यावेत. तांदूळ हि स्वच्छ धुवून घ्यावेत.
- 2
कुळीथ, तांदूळ दोन्ही वेगळे भिजत घालावेत. साधारण आठ तास भिजत घालावी.
- 3
आठ तासानंतर दोन्ही जिन्नस मिक्सरमधून फिरवून घ्यावे. आणि मोठ्या भांड्यात एकत्र करुन मीठ चवीनुसार घालुन घट्ट झाकुन ठेवावी. साधारणपणे रात्रभर ठेवावे म्हणजे सकाळी पीठ तयार होऊन येते.
- 4
सकाळी नेहमीच्या इडली - डोसेसारखेच करून घ्यावे. सोबत चटणी- सांबार गरम असतानाच खाऊन घ्या. छान लागतात.
- 5
आपल्या आवडीप्रमाणे या पीठात जीरे घालू शकतो. मटार आणि गाजर यासारख्या भाज्या घालून हि इडली बनवता येते.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15928241



टिप्पण्या