चिंचेचे पन्हे (Chinche che panhe recipe in marathi)

माझी आजी उन्हाळा सुरु झाला की चिंचेचे पन्हे तयार करायची. उन्हाळ्यात नवीन चिंचा बाजारात येत,मग काय चिंचेचे पन्हे घरी तयार होत असे. उन्हाचा त्रास जास्त होवू नये म्हणून चिंचेचे पन्हे प्यायची पद्धत आहे

कुकिंग सूचना
- 1
चिंच साफ करून घ्या आणि गरम पाणी करून त्यात पंधरा ते वीस मिनीटे भिजत ठेवा.
- 2
चिंच भिजली की कोळ काढणे सोपे जाते. आता भिजलेली चिंच हाताने कुस्करून घ्या.
- 3
आता चिंच कोळून झाली की त्यात वाटीभर किसलेला गुळ टाका.
- 4
आता मिश्रण एकजीव झालं की स्वादानुसार काळे मीठ आणि वेलची पावडर घाला. आता यात पाणी घालून छान मिक्स करा.
- 5
आपले चिंचेचे पन्हे तयार आहे. अगदी पटपट होणारे हे पन्हे एकदा पिवून पाहा. पुन्हा पुन्हा प्यावसं वाटतं एव्हढं भारी लागतं.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या