साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#EB15 #W15
पटकन होणारी चविष्ट व पौष्टिक अशी ही खीर आहे

साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)

#EB15 #W15
पटकन होणारी चविष्ट व पौष्टिक अशी ही खीर आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीस्वच्छ धुवून रात्रभर भिजवलेला साबुदाणा
  2. 3/4 लिटरगरम केलेले दूध
  3. 1/2 वाटीमिक्स कापलेले काजू,बदाम पिस्ता,अक्रोड
  4. 1/2 वाटीगुलाबाच्या पाकळ्या
  5. दीड टी स्पून वेलची पावडर
  6. 7 ते आठ केशर च्या काड्या
  7. 1/2 वाटीघट्ट साय
  8. 2 टीस्पूनचांरोळ्या
  9. 4 टिस्पून साजूक तूप
  10. 3/4 वाटीसाखर

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम जाड बुडाच्या कढईत तूप घालून भिजलेला साबुदाणा छान परतावा

  2. 2

    त्यामध्ये दूध ब केशर व साय घालून उकळत ठेवावे साबुदाणा शिजला की तो छान वरती तरंगतो आणि हलका v transparantहोतो मग त्यामध्ये साखर घालावी व छान उकळू द्यावे सतत ढवळावे

  3. 3

    मिश्रण घट्ट झाल की त्यात ड्रायफ्रूट्स काप, चारोळ्या व गुलाबाच्या पाकळ्या घाला मग वेलची पावडर घालून छान ढवळावे

  4. 4

    दोन ते तीन मिनिटांनी मिश्रण एकजीव झाले की गॅस बंद करावा व गरम गरम सर्व्ह करावे वाटल्यास वरती अजून ड्रायफ्रुट्स घालून सजवावे. चविष्ट व पौष्टिक अशी रुचकर खीर तयार होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes