कुकिंग सूचना
- 1
गुलाबजाम मिक्स पावडर ताटात काढून घ्यावी. (मी चितळे गुलाबजाम मिक्स घेतले आहे.) त्यात दूध घालून मऊसर गोळा मळून घ्यावा.
- 2
एकीकडे पातेल्यात साखर व पाणी मिक्स करून पाक करण्यास ठेवावा.साखर विरघळली,हाताला पाक थोडा चिकट लागला की त्यात वेलची पावडर घालावी.आपला पाक तयार आहे.
- 3
एकीकडे कढईत तेल/तूप गरम करण्यास ठेवावे.मळलेल्या गोळ्याचे लहान सुपारी एव्हढे गोळे करावे व मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
- 4
तळलेले गोळे पाकात घालावे.सात आठ तास पाकात मुरु द्यावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16117166















टिप्पण्या