कैरीचा चटकदार छुंदा (Kairicha Chunda Recipe In Marathi)

#उन्हाळी साठवणं
उन्हाळ्यातील सौरऊर्जा वापरुन निरनिराळे वाळवणाचे व साठवणीचे पदार्थ करणे ही पूर्वापार चालत आलेली भारतीय परंपरा आहे.उडदाचे,बटाट्याचे, पोह्याचे,नाचणी,तांदूळ,ज्वारीचे पापड,गव्हाच्या कुरडया, साबुदाण्याच्या कुरडया,पापड्या,सांडगे,बाजरीचे खारवडे हे वर्षभर लागतातच.त्याचबरोबर कैरीचे लोणचे,मिरची,लिंबाचे लोणचे,सिझनल भाज्यांचे लोणचे,छुंदा,साखरांबा, गुळांबा, मेथांबा ही तोंडीलावणी सुद्धा करुन ठेवलेली असली की अगदी भाजी नसली तरी पोटभर जेवण होऊ शकते.फेब्रुवारी ते एप्रिल असे तीन महिने कडाक्याचा उन्हाळा असतो याच सौर उर्जेचा योग्य वापर करून हे साठवणीचे पदार्थ करण्याची गृहिणीची लगबग असते.
यावर्षी माझ्या चुलतभावाच्या फार्महाऊसमध्ये आलेल्या घसघशीत मोठ्याशा राजापुरी कैऱ्या वानवळा म्हणून मिळाल्या.अजून उनही कडक असल्याने छुंदाच करायचे ठरवले.चार दिवस त्याच्यामध्ये मस्त वेळ गेला आणि चविष्ट व सगळ्यांच्या आवडीचा छुंदा तयार झाला.🤗👍😋

कुकिंग सूचना
- 1
कैऱ्या राजापुरी जातीच्या घ्याव्यात. त्या कडक,कमी आंबट आणि खोबऱ्यासारख्या असतात.या कैऱ्या 5-6तास पाण्यात बुडवून ठेवाव्यात. स्वच्छ धुवून चीक वगैरे काढून कोरड्या कराव्यात.सोलाण्याने साले काढावीत व जाड किसाच्या किसणीने किसाव्यात.या चार कैऱ्यांचा एक किलो कीस पडला.
- 2
सर्व कीस मोठ्या स्टीलच्या पातेल्यात घालावा. आता यात मीठ व साखर घालावे.साखरही मोजून घ्यावी व सगळीकडून हलवून घ्यावे.साखर,मीठ योग्य प्रमाणात घालावे.
- 3
स्टीलच्या पातेल्याला वरुन पातळ पांढरा मऊ असा पंचा घट्ट बांधून पातेले दररोज उन्हात ठेवावे. असे सलग चार दिवस ठेवावे.संध्याकाळी घरात आणून पंचा सोडवून डावाने सर्व मिश्रण हलवावे.असे दररोज करावे.कडक उन मिळेल अशा ठिकाणी दररोज 7-8तास पातेले ठेवावे.
- 4
चार दिवसानंतर कैरी साखरेचा घट्ट असा गोळा होतो.तसंच साखरेचा छान तार येणारा पाक होतो.आता यात तिखट आणि जीरेपूड घालावे.
- 5
- 6
पुन्हा एक दिवस 3-4तास छुंदा उन्हात ठेवावा व घट्ट झाकणाच्या बरणीत भरुन ठेवावा.ठेपले,पराठे,पोळी,धिरडी या बरोबर छान लागतो.तसंच फक्त जीरेपूड व तिखट असल्याने उपवासालाही चालतो.उन्हात ठेवलेला असल्याने वर्षभर छान टिकतो.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या